महाराष्ट्र लोकसेवा आयोग बद्दल संपूर्ण माहिती : Information Of MPSC 2024

Information Of MPSC 2024 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यांमधील विविध प्रशासकीय विभागांमध्ये वर्ग तीन पासून वर्ग एक पर्यंतच्या अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया केली जाते आयोगाच्या वतीने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून राज्यसेवा परीक्षा विक्रीकर निरीक्षक परीक्षा पोलीस उपनिरीक्षक परीक्षा मंत्रालयात सहाय्यक महाराष्ट्र वनसेवा परीक्षा महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा न्यायालयीन सेवा परीक्षा मोटर वाहन निरीक्षक परीक्षा लिपिक टंकलेखक परीक्षा इत्यादी सर्व सेवेतून विविध पदांच्या परीक्षा सामान्य राज्यसेवा चाचणी परीक्षा घेतल्या जातात तसेच प्रशासकीय सेवेमधील विभागांतर्गत परीक्षा घेतल्या जातात आयोग अंतर्गत राज्यसेवा परीक्षा मधून अधिकारी होण्यासाठी पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यांमधून जाणे आवश्यक असते राज्यसेवा परीक्षा मधून राज्य शासनाच्या सेवेतील व तांत्रिक राज्य पत्रिकेत गट अ आणि गट ब या संवर्गातील पुढील प्रदेशाची मागणी नुसार आणि पदांच्या उपलब्धतेनुसार भरण्यात येतात.

Information Of MPSC 2024
Information Of MPSC 2024

Information Of MPSC 2024 राज्यसेवेतील पदे :

उपजिल्हाधिकारी पोलीस उपअधीक्षक तहसीलदार विक्रीकर अधिकारी वर्ग 1, निबंधक वर्ग एक आणि दोन वृत्त लेखाधिकारी वर्ग एक आणि दोन गटविकास अधिकारी मुख्याधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नायब तहसीलदार सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विक्रीकर निरीक्षक मंत्रालय सहाय्यक लिपिक याशिवाय आयोग अंतर्गत महाराष्ट्र वन सेवा वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिक दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आणि प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी कर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खात्याच्या अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक सरळ सेवा मोटार वाहन उपनिरीक्षक विक्रीकर अधिकारी सहाय्यक इत्यादी परीक्षा घेण्यात येतात.

जिल्हा पातळीवर ती जिल्हा निवड समितीच्या अंतर्गत काही पदे दरवर्षी भरली जातात त्याप्रमाणे गृह विभाग पोलीस लिपिक वन विभाग वनपाल वनरक्षक आणि चालक सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक अनुरेखक कनिष्ठ अभियंता कृषी विभाग कृषी सेवक कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक कृषी पर्यवेक्षक भूमापन विभाग भूमापक आणि कनिष्ठ लिपिक पाटबंधारे विभाग कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक अनुरेखा कनिष्ठ अभियंता आरोग्य विभाग आरोग्य सेवक व शिक्षण विभाग कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक महसूल विभाग तलाठी आणि ग्रामसेवक यांचा समावेश होतो. Information Of MPSC 2024

एमपीएससी बद्दल संपूर्ण माहिती :

या परीक्षेचे एकूण तीन टप्पे असतात

  • पूर्वपरीक्षा 400 गुण
  • मुख्य परीक्षा 800 गुण
  • मुलाखत 100 गुण

राज्यसेवा पूर्व परीक्षा :

राज्यसेवा परीक्षा मधील हे महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे पद समजले जाते ही परीक्षा पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते पूर्वपरीक्षा ही एकूण 400 गुणांची असते.

पेपर एक सामान्य अध्ययन गुण 200 :

वेळ दोन तास यामध्ये चालू घडामोडी आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भारताचा स्वातंत्र्य लढा भूगोल महाराष्ट्र भारत आणि जग भारताचे संविधान पंचायत राज शहरी स्थानिक स्वराज्य संस्था अर्थशास्त्र सामाजिक विकास दारिद्र्य आणि बेरोजगारी पर्यावरण परिसंस्था जैवविविधता आणि सामान्य विज्ञान या विषयांवरती प्रश्न विचारले जातात.

पेपर दोन , गुण 200 व दोन तास :

यामध्ये प्रामुख्याने तर्कशक्ती निर्णय क्षमता सामान्य बुद्धिमापन चाचणी अंकगणिती मराठी आणि इंग्रजी मधील सुसंवाद कौशल्य व्याकरणावर प्रश्न विचारले जातात.

मुख्य परीक्षा माहिती :

राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची खरी कसोटी असते ही परीक्षा 800 गुणांची असून यामध्ये एकूण चार पेपर असतात पेपर साठी 150 गुण यामध्ये इतिहास भूगोल महाराष्ट्राच्या संदर्भासह आधुनिक भारताचा इतिहास भारतीय संविधानाचा प्राथमिक अभ्यास भारतीय राजकारण महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात बरोबरच मानवी संसाधन आणि मानवी हक्क अर्थव्यवस्था आणि नियोजन तसेच विकास विषयक अर्थशास्त्र कृषी आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरती प्रश्न विचारले जातात मराठी आणि इंग्रजी भाषा या वरती प्रत्येकी 100 गुणांचा पेपर हसतो यामध्ये निबंध लेखन उतारा प्रश्न व्याकरण यावरती प्रश्न जास्त विचारले जातात अंतिम निवड करण्यासाठी 100 गुणांची मुलाखत प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असते. Information Of MPSC 2024

पीएसआय एसटीआय आणि सहाय्यक :

मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये किंचित बदल वगळता या परीक्षांचे स्वरूप एक समानच असते मंत्रालयीन सहाय्यक या पदासाठी मुलाखत नसून अंतिम परीक्षेमध्ये मिळालेल्या कोणाच्या आधारे निवड करण्यात येते पोलीस उपनिरीक्षक आणि विक्रीकर निरीक्षक यांना मुलाखतीची प्रक्रिया पार पाडावी लागते पोलीस उपनिरीक्षक विक्रीकर निरीक्षक सहाय्यक या पदांसाठी सर्व परीक्षा एकूण 100 गुणांच्या असतात तिनेही पदांसाठी पूर्वपरीक्षेचे स्वरूप सारखेच असते प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात या प्रश्नांमध्ये चालू घडामोडी नागरिकशास्त्र भारतीय घटनेचा प्राथमिक अभ्यास राज्य व्यवस्थापन ग्रामव्यवस्था पण इतिहास भूगोल राज्याच्या संदर्भासह पृथ्वी हवामान अक्षांश रेखांश जमिनीचे प्रकार मुख्य पिके पर्जन्यमान शहरे नद्या उद्योगधंदे अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीति शासकीय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प लेखा परीक्षण सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतिशास्त्र प्राणिशास्त्र आरोग्यशास्त्र बुद्धिमापन आणि अंकगणित या विषयांवरती जास्त प्रश्न विचारले जातात.

मुख्य परीक्षा :

Information Of MPSC 2024 वरील तिन्ही पदांसाठी मुख्य परीक्षेला दोन पेपर असतात या पेपरमध्ये पेपर क्रमांक एक भाषा असून यामध्ये इंग्रजी भाषा या विषयावर 40 गुणांचे आणि मराठी भाषेवर ती साठ गुणांसाठी असे एकूण 100 प्रश्न विचारले जातात. या पेपरमध्ये व्याकरण उतारा प्रश्न वाक्यरचना म्हणी शब्दसंग्रह यावरती प्रश्न आधारित असतात पेपर दोन सामान्य अध्ययन 100 गुणांचा असतो या पेपरमध्ये सर्वसाधारण चालू घडामोडी राज्य ते जागतिक स्तरावरील बुद्धिमापन चाचणी भूगोल भारत आणि जग इतिहास माहिती अधिकार सामाजिक सुधारणा चळवळी भारताचे संविधान मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या महिला संरक्षण घरगुती हिंसाचार कायदा कृषी तंटामुक्ती अभियान संगणक आणि माहिती तंत्रज्ञान ॲट्रॉसिटी मुंबई पोलीस कायदा पुरावा कायदा सीआरपीसी आणि आयपीसी यावर प्रश्न विचारले जातात.

मुख्य परीक्षा अंतर्गत विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालयातील सहाय्यक या पदांसाठी पोलीस संदर्भातील अभ्यासक्रम तसेच संगणक आणि माहिती तंत्रज्ञान या विषयावर ऐवजी लेखाकर्म या विषयावर प्रश्न विचारले जातात पोलीस उपनिरीक्षक पदाची मुलाखत 50 गुणांची असून शारीरिक चाचणी 100 गुणांची असते ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर अंतिम निवड करण्यात येते.

12 नंतर मर्चंट नेव्ही मध्ये ऑफिसर पद कसे मिळवावे ? 

FAQ :

एमपीएससी परीक्षेसाठी किती टक्के असतात ?

एकूण 03 टप्पे

एमपीएससी परीक्षेसाठी पात्रता काय आहे ?

पदवीधर

Leave a Comment