After 10th Government Jobs 2024 सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा कामाची सुरक्षितता चांगला पगार यामुळे प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असते सरकारी नोकरीसाठी आपल्याला शिक्षणही घ्यावे लागते विविध परीक्षा सुद्धा द्याव्या लागतात आणि मेरिट लिस्ट नुसार उमेदवारांची निवड केली जाते काही सरकारी नोकरी अशा आहेत की फक्त 10 वी पास वरती सुद्धा नोकरीसाठी पात्र ठरता येते आज आपण आपल्या लेखामध्ये 10 वी पास वरती सरकारी नोकरी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्ही सुद्धा 10 वी पास झाल्यानंतर सरकारी नोकरी मिळवू शकता.
केंद्र सरकार किंवा इतर राज्य सरकार यामध्ये काही असे डिपार्टमेंट आहेत की जिथे विशिष्ट पदांसाठी भरती करत असताना 10 वी पास ही पात्रता असते का ही पात्रता करणारा कुणीही या ठिकाणी अर्ज सादर करू शकतो काही नोकऱ्या अशा आहेत की तिथे कोणत्याही प्रकारची परीक्षा न घेता एप्लीकेशन मधून इयत्ता बारावीच्या गुणांच्या आधारे निवड केली जाते आणि इतर सरकारी नोकरांसाठी शक्यतो सामायिक परीक्षा देखील घेतली जाते त्यामधील गुणांच्या आधारे निवड केली जाते.
सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏
10वी नंतर सरकारी नोकरीच्या संधी | After 10th Government Jobs 2024
भारतीय डाक विभाग भरती :
जर तुम्ही 10 वी पास झाले असाल तर भारतीय पोस्ट खात्यामध्ये ग्रामीण डाक सेवक मल्टी टास्किंग स्टाफ ही पदे 10 वी पासच्या पात्रते नुसार असतात यामध्ये ग्रामीण भाग सेवेची पदेही दहावीच्या गुणांवर आधारित ती डायरेक्ट भरली जातात. जर तुम्ही पण 10 वी उत्तीर्ण झाले असाल आणि तुम्हाला पोस्ट विभागात सरकारी नोकरी करायची असेल तर तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि ज्यावेळी ही भरती निघेल त्यावेळी भरती मधील पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरती या भरती संबंधित पूर्वसूचना आणि जाहिराती दिली जाईल. ते तूम्ही वाचू शकता.
भारतीय रेल्वेमध्ये नोकरी :
भारतीय रेल्वे हे आपल्या देशामधील सर्वात जास्त नोकरी जॉब देणारे डिपारमेंट आहे भारतीय रेल्वे ही केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येते यामध्ये 10 वी पास वरती टेक्निशियन, ट्रक मॅन, गॅंग मॅन, पॉईंट्स मॅन, पोर्टर तसेच हेल्पर इत्यादी प्रकारची अनेक पदे असतात आणि रेल्वे सुरक्षा दलामध्ये दहावी पास वरती भरती केली जाते जर तुम्ही पण दहावी उत्तीर्ण असाल तर तुमचे वय 18 वर्षे पूर्ण झाले असतील आणि तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने जेव्हा भरती निघेल तेव्हा अर्ज करू शकतात.
पोलीस दल भरती :
राज्यामध्ये पोलीस भरती नेहमी होत असतात काही राज्यांमध्ये पोलीस भरती दहावी पास भरती देखील केली जाते पोलीस विभागामध्ये सुद्धा अनेक प्रकारची पदे रिक्त असतात ज्यांची पात्रता ही फक्त दहावी पास असते पोलीस डिपारमेंट मधील कारागृह विभागांमध्ये सुद्धा अनेक प्रकारची पदे 10 वी पास वरती असतात तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये सुद्धा 10 वी पास वरती भरपूर जागा निघत असतात .
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी भरती :
After 10th Government Jobs 2024 महाराष्ट्र राज्याच्या तसेच इतर राज्यांच्या वीज मंडळांमध्ये सुद्धा विद्युत सहाय्यक वायरमन अशा विविध प्रकारची पदे असतात जिथे तुम्ही फक्त 10 वी पास वरती अर्ज करू शकता तसेच यामधील पदांना दहावी बरोबरच ITI ची सुद्धा आवश्यकता असते त्यामुळे जर तुम्ही दहावीनंतर संबंधित ट्रेड मधील आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर तुम्ही या पदांसाठी नक्की अर्ज करू शकता.
भारतीय सैन्य अग्निविर भरती :
भारतीय सैन्यामध्ये अग्निविर ही नवीन योजना सुरू केलेली आहे यामध्ये भारतीय सैन्याच्या वायू आणि भूदल तसेच नेव्ही यासारख्या दलामध्ये इच्छुक असलेल्या उमेदवारांची भरती केली जाते यामध्ये सुद्धा 10 वी पास वरती अनेक पदे रिक्त असतात अधिक माहितीसाठी आपण अग्निविर या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन माहिती पाहू शकता या भरतीसाठी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो यानंतर परीक्षा आणि शारीरिक चाचण्या होत असतात आणि त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली जाते.
वनविभाग भरती :
वनविभाग मध्ये अनेक राज्यांमध्ये वनरक्षक तसेच लघुलेखक या पदांसाठी 10 वी पास वरती अनेक भरत्या निघत असतात जर तुमच्याकडे या पदासाठी आवश्यक असलेली शारीरिक पात्रता असेल आणि तुम्हाला वनविभागामध्ये काम करण्याची आवड असेल तर तुम्ही जेव्हा या विभागामध्ये भरती जाहीर होईल त्यावेळी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. After 10th Government Jobs 2024
आरोग्य विभाग भरती :
अनेक राज्याच्या आरोग्य विभागामध्ये ग्रुपच्या पदासाठी 10 वी पास वरती भरती केली जाते महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा नुकतीच आरोग्य विभागाच्या वतीने खूप मोठी भरती जाहीर केली होती यामध्ये सुद्धा 10 वी पास वरती अनेक रिक्त पदे उपलब्ध होती थोडक्यात तुम्हाला सुद्धा आरोग्य विभागामध्ये सरकारी नोकरी करायची असेल तर इथे तुम्ही अर्ज करू शकता यासाठी आरोग्य विभागाच्या वेबसाईटला नेहमी भेट देत राहा जेणेकरून कोणत्याही भरती बद्दल तुम्हाला लगेच माहिती मिळेल.
कृषी विभाग भरती :
After 10th Government Jobs 2024 आपल्या देशामध्ये अनेक राज्यांमध्ये कृषी विभागांमधील काही पदेही दहावी पास वरती आता जर तुम्हाला कृषी संबंधित क्षेत्रामध्ये काम करायची इच्छा असेल तर तुम्ही या विभागामध्ये परतीच्या वेळी अर्ज करू शकता भरतीच्या अधिक माहितीसाठी या विभागच्या अधिकृत वेबसाईटला सतत भेट देणे गरजेचे आहे.
सशस्त्र दल भरती :
भारताच्या सशस्त्र दल विभागाच्या माध्यमातून सुद्धा दहावी पास उमेदवारांना भरतीची सुवर्णसंधी दिली जाते या ठिकाणी सुद्धा सरकारी नोकरीची संधी देशांमधल्या 10 वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मिळते आर्मी आणि नेहमी व एअरफोर्स मध्ये 10 वी उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना नोकरीची संधी दिली जाते.
तटरक्षक दल भरती :
भारताच्या तटरक्षक दल अंतर्गत सुद्धा नोकरीची सुवर्णसंधी 10 वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मिळते सागरी पर्यावरण रक्षण, शोध आणि बचाव कामे आणि इतर महत्त्वाच्या सागरी जबाबदाऱ्या असतात दहावी पास झालेल्या उमेदवारांसाठी जनरल ड्युटी म्हणून भरती केली जाते.
सीमा सुरक्षा दल भरती :
भारतीय सीमा सुरक्षा दलामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारची नोकरीची संधी 10 वी पास झालेल्या उमेदवारांना दिली जाते विविध प्रकारच्या पदांसाठी 10 वी पास उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाते याबरोबरच समतुल्य असणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये सुद्धा जीडी म्हणजे जनरल ड्युटी पदासाठी अर्ज करू शकतात. After 10th Government Jobs 2024
भारतीय नौदल विभागामध्ये सुद्धा 10 वी पास उमेदवारांना नोकर भरतीसाठी संधी उपलब्ध करून दिली जाते 10 वी पास उमेदवारांनी सतत नोकरीच्या अधिकृत वेबसाईट वरती भेट देणे आवश्यक आहे जेणेकरून भरती बद्दल त्यांना लगेच माहिती मिळेल.
SSC/ स्टाफ सिलेक्शन कमिशन – कर्मचारी निवड आयोग भरती :
After 10th Government Jobs 2024 स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत सुद्धा 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मेगा भरती केली जाते हवालदारांनी मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी दरवर्षी 10 वी उत्तीर्ण पात्रते भरती केली जाते बऱ्याच प्रमाणामध्ये 10 वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होतात दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी सगळ्यात मोठी ही सुवर्णसंधी असते.
होमगार्ड भरती :
होमगार्ड विभागाच्या माध्यमातून सुद्धा दहावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना निमशासकीय स्वरूपाची नोकरीची संधी दिली जाते राज्य सरकारच्या अधिपत्याखाली ही भरती केली जाते या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो शारीरिक चाचणी मध्ये पास होऊन आणि इतर प्रक्रियेमधून उमेदवारांना यामध्ये भरती होत आहे ते सध्या महाराष्ट्रामध्ये 9000 पदांसाठी होमगार्ड भरती जाहीर करण्यात आली होती.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शिष्यवृत्ती योजना
FAQ :
होमगार्ड भरती साठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
दहावी उत्तीर्ण
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर कोण कोणत्या सरकारी नोकरी मिळतात ?
होमगार्ड भरती, सशस्त्र पोलीस दल, तटरक्षक, वनरक्षक, पोस्ट ऑफिस भरती आणि स्टाफ सिलेक्शन मल्टी टास्किंग इत्यादी.