After 12th Diploma Courses बारावी बोर्डाची परीक्षा केव्हाच संपली असून आता प्रत्येकाला रिझल्टची उत्सुकता आहे कित्येकांच्या मनामध्ये रिझल्ट बदल धाकधुक सुद्धा असेल 12 वी नंतर पुढे काय हा प्रश्न खूप जणांना सदावत असेल प्रत्येक जणांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या आपल्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये करिअर करण्याची सगळ्यांची इच्छा असते परंतु बऱ्याच जणांना बारावी नंतर नक्की कोणता कोर्स करावा जेणेकरून आपल्याला लगेच जॉब मिळू शकतो याची माहिती नसते म्हणून आज याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे ही माहिती संपूर्ण वाचा आणि इतरांना सुद्धा शेअर करायला विसरू नका.
After 12th Diploma Courses हे आहेत 12 वी नंतरचे सर्वोत्तम डिप्लोमा कोर्सेस :
12 वी नंतर आपण विविध विषयांमधील डिप्लोमा कोर्सेस करू शकतो जे आपल्यामधील कौशल्य विकसित करतात आणि आपल्याला चांगला जॉब मिळवण्यासाठी सुद्धा मदत करतात पुढे काही डिप्लोमा कोर्सेस ची यादी दिलेली आहे जे तुम्ही बारावीनंतर सुद्धा करू शकता.
- सिविल इंजीनियरिंग
- मेकॅनिकल इंजिनिअरिंग
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
- कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
- इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग
आर्ट आणि डिझाईन मधील डिप्लोमा :
After 12th Diploma Courses तुम्हाला कलेची आवड असेल तर त्याच रूपांतर तुम्हाला करिअरमध्ये करता येऊ शकते विशेषतः तुम्हाला डिझायनिंग वगैरे चांगले जमत असेल तर या क्षेत्रांमधील डिप्लोमा तुम्हाला फायद्याचं ठरेल. तसेच नोकरी बरोबर तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील डिप्लोमा नंतर सुरू करू शकता. आर्ट आणि डिझाईन मधील विविध प्रकारचे डिप्लोमा पुढीलप्रमाणे आहेत
- ग्राफिक डिझायनिंग
- फॅशन डिझायनिंग
- ज्वेलरी डिझायनिंग
- इंटेरियर डिझायनिंग
- ॲनिमेशन
बिझनेस मॅनेजमेंट मधील डिप्लोमा :
जर तुमच्यामध्ये नेतृत्व गुण सोबत व्यवस्थापन कौशल्य असतील दरिया क्षेत्रामध्ये तुम्ही चांगले यश मिळवू शकता यामध्ये पुढील प्रकारचे डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत
- फायनान्स मॅनेजमेंट
- मार्केटिंग मॅनेजमेंट
- ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट
- सप्लाय चेन मॅनेजमेंट
आयटी क्षेत्रामधील डिप्लोमा :
आयटी क्षेत्र हे सतत डेव्हलप होणारे क्षेत्र आहे . जास्त पगार आणि आकर्षक सुविधा यामुळे हल्ली प्रत्येक जण या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची इच्छा ठेवतो तुम्हाला सुद्धा आयटी क्षेत्राची आवड असेल तर तुम्ही खालील विषयांमध्ये डिप्लोमा कोर्स करू शकता. After 12th Diploma Courses
- वेब डेव्हलपमेंट
- डेटा अनालिस्त
- सायबर सेक्युरिटी
- डिजिटल मार्केटिंग
- कम्प्युटर हार्डवेअर
- कम्प्युटर नेटवर्किंग
फोटोग्राफी :
कला आणि तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट मिलाफ म्हणजे फोटोग्राफी हल्ली इमेज बाजार सारख्या अनेक वेबसाईट्स आहेत ज्यावर ती तुम्हाला हजारो रुपये खर्च करून फोटो विकत घ्यावे लागतात यावरून या क्षेत्रांमधील पैसा तुमच्या लक्षात येईल तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छित असाल तर तुम्ही प्रोफेशनल फोटोग्राफी शिकणे आवश्यक आहे काही डिप्लोमा कोर्सेस हे विशिष्ट प्रकारच्या फोटोग्राफी वरती लक्ष केंद्रित करतात जसे की लँड स्कोप फोटोग्राफी पोर्ट्रेट फोटोग्राफी किंवा फॅशन फोटोग्राफी इव्हेंट फोटोग्राफी इत्यादी यासाठी तुम्ही पुढील कोर्सेस करू शकता.
- फोटोग्राफीतील डिप्लोमा
- डिप्लोमा इन अप्लाइड फोटोग्राफी
- डिप्लोमा इन कमर्शियल फोटोग्राफी
- डिप्लोमा इन फोटोग्राफी अँड व्हिडिओग्राफी
- डिप्लोमा इन फाईन आर्ट फोटोग्राफी
पत्रकारिता :
After 12th Diploma Courses पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो भारतामध्ये पत्रकारितेची खूप मोठी परंपरा आहे. अनेक दिग्गज लोकांनी पत्रकारितेच्या आणि देशाच्या इतिहासावर आपला ठसा उमटवला आहे समाजामध्ये महत्त्वाची भूमिका आणि जबाबदारी पत्रकार बजावत असतात तुम्हाला जर पत्रकारितेमध्ये आवड असेल तर तुम्ही यामधील काही कोर्सेस करू शकता जिथे पत्रकारितेसाठी आवश्यक कौशल्य शिकवली जातात. पत्रकारिता यामधील डिप्लोमा कोर्स केल्यानंतर तुम्ही एक पत्रकार संपादक, उपसंपादक रिपोर्टर किंवा कॉपी एडिटर यासारख्या पदावर काम करू शकता.
- पत्रकारिता डिप्लोमा
- ब्रॉडकास्टिंग मध्ये डिप्लोमा
- पत्रकारिता आणि लोकसंपर्क यामधील डिप्लोमा
- डिजिटल पत्रकारितेमधील डिप्लोमा
- मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा
हॉटेल मॅनेजमेंट :
हॉटेल व्यवसाय हा सर्वकाही चालणारा व्यवसाय आहे देशामध्ये आणि परदेशामध्ये सुद्धा हॉटेल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रचंड मागणी आहे. या क्षेत्रामध्ये आपल्याला नोकरी बरोबर स्वतःचा व्यवसाय सुद्धा करता येतो. जर तुम्हाला लोकांना सेवा देणे तसेच विविध खाद्यपदार्थ बनवणे यांसारख्या गोष्टींची आवड असेल तर हे हॉटेल मॅनेजमेंट चे क्षेत्र तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय बनू शकते. हॉटेल मॅनेजमेंट चा डिप्लोमा कोर्स पूर्ण करून तुम्ही या क्षेत्रामध्ये तुमची स्वप्ने पूर्ण करू शकता. हॉटेल मॅनेजमेंट हा डिप्लोमा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढील पदावर नोकरीची संधी मिळू शकते.
- हॉटेल मॅनेजर
- फ्रंट ऑफिस मॅनेजर
- फूड बेवरेज मॅनेजर
- मानव संसाधन मॅनेजर
- हाउसकीपिंग मॅनेजर
- रेस्टॉरंट मॅनेजर
- इव्हेंट मॅनेजर
- टूर ऑपरेटर
- एअरलाइन्स केटरिंग मॅनेजर
इव्हेंट मॅनेजमेंट :
रोज टीव्ही वरती मोठे मोठे इव्हेंट ऑरेंज केले जातात एखाद्या कंपनीचा नवीन प्रोडक्ट लॉन्च करणे असो किंवा एखाद्या नवीन उद्योगाची स्थापना एखादा पुरस्कार सोहळा राजकीय सभा किंवा लग्न सोहळा हे सर्व इव्हेंट मॅनेज करण्याचे काम इव्हेंट मॅनेजर करत असतो. तुमच्यामध्ये जर मॅनेजमेंटची कौशल्य असतील आणि या क्षेत्राची आपल्याला आवड असेल तर या क्षेत्रांमधील डिप्लोमा करून आपले करिअर इथे घडू शकता येते.
फॉरेन लॅंग्वेज :
जग हे आता तंत्रज्ञानामुळे जवळ आलेला आहे अनेक कंपन्या आणि संस्था या एकापेक्षा अनेक देशांमध्ये काम करत असतात त्याबरोबरच साहित्य कला यांची आता आपापसात देवाण-घेवाण होत असते. सध्याच्या युगात इंटरनेटवर सुद्धा आता इंग्रजी भाषेबरोबरच इतर अनेक भाषांचा वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर एखादी परदेशी भाषा शिकून घेणे आपल्याला खूप फायद्याचे ठरू शकते. इतकेच नव्हे तर आपण एक उत्तम करिअर फॉरेन लॅंग्वेज च्या आधारावर सकार करू शकतो तुम्हाला नवीन भाषा शिकवणे आवडत असेल तर तुम्ही पुढीलपैकी एखादा फॉरेन लॅंग्वेज डिप्लोमा करू शकता. After 12th Diploma Courses
- फॉरेन लॅंग्वेज डिप्लोमा
- फ्रेंच भाषेमध्ये डिप्लोमा
- जर्मन भाषेमध्ये डिप्लोमा
- चिनी भाषेमध्ये डिप्लोमा
- स्पॅनिश भाषेमध्ये डिप्लोमा
- जपानी भाषेमध्ये डिप्लोमा
FAQ :
आर्ट आणि डिझाईन मध्ये कोणकोणते डिप्लोमा आहेत ?
ग्राफिक डिझाईनिंग, फॅशन डिझायनिंग, ज्वेलरी डिझाईनिंग, इंटेरियर डिझाईनिंग, ॲनिमेशन
आयटी क्षेत्रामधील कोणकोणते डिप्लोमा आहे ?
वेब डेव्हलपमेंट, डेटा अनालिस्त, सायबर सेक्युरिटी,डिजिटल मार्केटिंग, कम्प्युटर हार्डवेअर, कम्प्युटर नेटवर्किंग
बारावीनंतर सर्वोत्तम कोर्स कोणते आहेत ?
सिविल इंजीनियरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग