Dnyanjyoti Savitribai Phule Yojana 2024 राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून एक नवीन योजना सुरू केलेली आहे या योजनेचे नाव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना असे आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना सरकारद्वारे एकूण 60 हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते या पैशांचा वापर करून विद्यार्थी आपल्या पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक गरजा पूर्ण करू शकतात.
या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्रामधील ओबीसी वर्गामधील आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे हा आहे तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो हे लक्षात घेऊन राज्य सरकारद्वारे 60 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏
महाराष्ट्र मधील ओबीसी जर तुम्ही असाल आणि महत्त्वाचे म्हणजे ओबीसी प्रवर्गातील असाल तर तुम्ही या योजनेचा सोप्या पद्धतीने लाभ घेऊ शकता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या योजनेचा लाभ कसा घ्यायचा या योजनेसाठी पात्रता आणि निकष काय आहेत आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत आणि विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज कसा करू शकतात याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला एक शेवटपर्यंत वाचणे गरजेचे आहे.
Dnyanjyoti Savitribai Phule Yojana 2024 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना :
महाराष्ट्र राज्यामधील ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दरवर्षी 60 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे महाराष्ट्र सरकार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणाली द्वारे ही मदत थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहेत त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांपर्यंत योग्य रक्कम पोहोचण्याची खात्री होते.
या योजनेची उद्दिष्टे :
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा उद्देश महाराष्ट्र राज्यामधील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरवणी हा आहे जे विद्यार्थी विविध कारणास्तव शासकीय वसतिगृह किंवा महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करत असतात आणि प्रवेश मिळाल्यानंतरही त्यांना शिक्षणाचा पूर्ण खर्च भागवता येत नाही या सर्व अडचणी लक्षात घेऊन राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे या योजनेनुसार पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी 60 हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
या आर्थिक मदतीचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांचे आवश्यक खर्च जसे की अन्न निवास आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी या आर्थिक मदतीचा लाभ होणार आहे ज्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींची चिंता न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येऊ शकणार आहे ही योजना विशेषतः भटक्या जमाती श्रेणी मधील धनगर समाज वगळता इतर मागासवर्ग मधील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना लक्ष करते राज्यभरातील एकूण 21 हजार 600 विद्यार्थ्यांना ज्यामध्ये प्रति जिल्हा 600 विद्यार्थ्यांचा समावेश आहे लाभ देण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे ज्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना न करता उच्च शिक्षण घेता येणार आहे.
या योजनेसाठी पात्रता काय आहे ?
- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याकरता आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने विशिष्ट पात्रता निकष निश्चित केलेले आहेत जे विद्यार्थ्यांना पूर्णपणे आवश्यक असणार आहे ते खालील प्रमाणे जाणून घेऊ.
- अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे बंधनकारक आहे
- अपंग श्रेणी मधील विद्यार्थ्यांसाठी 40% पेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा शालेय चिकित्सा कडून मिळवणे बंधनकारक राहणार आहे
- अर्जदार ओबीसी प्रवर्गातील असणे आवश्यक आहे आणि त्याचा पुरावा म्हणून जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे
- अनाथ प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला आणि बालकल्याण विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याने द्वारे दिलेले अनाथ तत्व प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील
- विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे
- विद्यार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्ड ची लिंक केलेले असणे आवश्यक आहे
- अर्जदार विद्यार्थी दुसऱ्या शहरांमध्ये शिक्षण घेत असल्यास आणि वसतिगृहामध्ये किंवा भाड्याने घेतलेल्या खोलीमध्ये राहत असल्यास त्यांना अर्ज करण्यासाठी पात्रता मिळणार आहे. Dnyanjyoti Savitribai Phule Yojana 2024
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- जात प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- उत्पन्न प्रमाणपत्र
- दहावी आणि बारावीचे मार्कशीट
- शाळा किंवा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा
- मोबाईल नंबर
- बँक खाते पासबुक
या योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये :
- कमकुवत आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या ग्रामीण आणि शहरी भागांमधील ओबीसी विद्यार्थ्यांना वार्षिक 60 हजार रुपये हे उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत सरकारद्वारे दिली जाणार आहे
- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी एका जिल्ह्यामधील एकूण 600 पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देणे अपेक्षित आहे
- ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ते अभ्यासासाठी लागणारे साहित्य खरेदी करू शकतात तसेच त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतील.
- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा फायदा अनुसूचित जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे
- डीबीटी चा वापर करून पैसे लाभार्थ्यांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरित केले जाणार आहेत
- या प्रकारची शिष्यवृत्ती योजना वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यास मदत करेल Dnyanjyoti Savitribai Phule Yojana 2024
या योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
- अर्ज करण्यासाठी तुमच्या ब्लॉग किंवा जिल्ह्याच्या तुमच्या जवळच्या समाजकल्याण कार्यालयामध्ये जाणे गरजेचे आहे
- कार्यालयामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळवावेत
- फॉर्म काळजीपूर्वक वाचा आणि विचारलेली सर्व आवश्यक माहिती तपशील काळजीपूर्वक भरायचा आहे फॉर्म सोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे देखील जोडणे बंधनकारक आहे
- अर्ज सबमिट करा आणि तुम्हाला एक पावती मिळेल आणि ती तुमच्याकडे सुरक्षित जपून ठेवणे गरजेचे आहे
- आता तुमचा अर्ज पडताळणी अंतर्गत असेल आणि सर्व काही योग्य आढळल्यास तुमची पात्र उमेदवारी म्हणून निवड केली जाईल आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल
महाराष्ट्र लोकसेवा आयोग बद्दल संपूर्ण माहिती
FAQ :
या योजनेसाठी पात्रता काय आहे ?
अर्जदार हा मूळ महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
या योजनेअंतर्गत किती लाभ मिळतो ?
वार्षिक साठ हजार रुपये
या योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा ?
तुमच्या ब्लॉग किंवा जिल्ह्याच्या तुमच्या जवळच्या समाजकल्याण कार्यालयामध्ये जाऊन