तुम्हाला पोलीस व्हायचंय ? पहा पोलीस भरती बद्दल संपूर्ण माहिती : Information Of Police Bharti 2024

Information Of Police Bharti 2024 सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोलीस भरती ही भरती मधील सगळ्या राज्यांमध्ये होते आणि महाराष्ट्र राज्य मधल्या पोलीस भरती आणि जिल्ह्यानुसार पोलीस शिपाई भरतीची माहिती जाणून घेऊयात पोलीस भरती मध्ये वेगवेगळी पदे असतात जसे की पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई तर तिन्ही पदांसाठी शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा चाचणी मध्ये मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाते आता

Information Of Police Bharti 2024
Information Of Police Bharti 2024

Information Of Police Bharti 2024 या परीक्षेद्वारे भरली जाणारी पदे :

  • पोलीस शिपाई
  • पोलीस शिपाई चालक
  • सशस्त्र पोलीस शिपाई

सूट :

  • शासनाने जाहीर केल्याप्रमाणे नक्षलग्रस्त भागामध्ये जे राहतात त्यांच्यासाठी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये अथवा नक्षल विरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार पोलीस पाटील किंवा पोलिस कर्मचारी यांचे अपत्य उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता करण्यात येईल
  • उंची 4 सीएम महिला व पुरुष उमेदवारांसाठी
  • खेळाडूंसाठी आवश्यक पात्रतेच्या अटी आणि शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष आणि महिला खेळाडूंना किमान उंचीच्या अटी मध्ये 2.5 सीएम इतकी सूट दिली जाते

सूट :

शासनाने जाहीर केले नुसार नुकसानग्रस्त भागांमध्ये जे राहतात त्यांच्यासाठी असलेली अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये अथवा नक्षल विरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार पोलीस पाटील अथवा पोलिस कर्मचारी यांचे अपत्य उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येते.

  • उंची 4 सीएम महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी
  • छातीच्या मोजमापाचे आवश्यकता नसते
  • खेळाडूंसाठी आवश्यक पात्रतेच्या अटी आणि शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुषाने महिला खेळाडूंना किमान उंचीच्या अटी मध्ये 2.5 सीएम इतकी सूट दिली जाते. Information Of Police Bharti 2024

पोलीस भरती शारीरिक चाचणी :

पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणी होतील याची आता आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत

पोलीस शिपाई पदासाठी :

पोलीस शिपाई नियम 2011 आणि त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या तरतुदीनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची खालील प्रमाणे 50 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाते.

पुरुषांसाठी आणि गुण :

  • 1600 मीटर धावणे आणि गुण 20
  • 100 मीटर धावणे गुण 15
  • गोळा फेकून 15
  • एकूण गुण 50

महिलांसाठी गुण :

  • 800 मीटर धावणे गुण 20
  • 100 मीटर धावणे गुण 15
  • गोळा फेक गुण 15
  • एकूण गुण 50

पोलीस शिपाई चालक पदासाठी :

महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक पोलीस हवलदार चालक पोलीस नाईक चालकांनी पोलीस शिपाई चालक नियम 2019 मधील तरतुदीनुसार पोलीस शिपाई चालक या पदांच्या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची खालील प्रमाणे 50 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाते.

पुरुषांसाठी गुण :

  • 1600 मीटर धावणे गुण 30
  • गोळा फेकून गुण 20
  • एकूण गुण 50

महिलांसाठी गुण :

  • 800 मीटर धावणे गुण 30
  • गोळा फेकून 20
  • एकूण गुण 50

सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी :

Information Of Police Bharti 2024 महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाला मधील सशस्त्र पोलीस शिपाई नियम 2012 आणि त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या तरतुदीनुसार सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची खालील प्रमाणे 100 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाते :

पुरुषांसाठी गुण :

  • पाच किलोमीटर धावणे गुण 50
  • 100 मीटर धावणे गुण 25
  • गोळा फेक गुण 25
  • एकूण गुण 100

पोलीस भरती लेखी अभ्यासक्रम :

पोलीस भरती मध्ये वेगवेगळे पदे असतात जसे की पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई तर पहिले पोलीस शिपाई बद्दल माहिती जाणून घेऊ.

पोलीस शिपाई :

  • मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाते
  • शारीरिक चाचणी मध्ये किमान 50 गुण मिळवणे गरजेचे असते 50 गुण मिळवणारे उमेदवार लेखी चाचणीसाठी पात्र असतात
  • उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे बंधनकारक असते
  • लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजले जातात
  • लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असतो आणि लेखी चाचणी मराठी भाषेमध्ये घेतली जाते
  • सर्व प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे असतात
  • 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते Information Of Police Bharti 2024

चाचणीमध्ये खालील विषयांचा समावेश असतो :

  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण

पोलीस शिपाई चालक :

  • मैदानी चाचणी पूर्ण झाल्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाते
  • शारीरिक चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणारे उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवले जातात
  • लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी हलके मोटार वाहन चालवण्याची चाचणी 25 गुण आणि जीपी प्रकारांमधील वाहन चालवण्याची चाचणी 25 गुण अशा दोन चाचण्या देणे बंधनकारक असते या दोन्ही चाचणी अंतर्गत एकत्रित किमान 40 टक्के गुण मिळवून उमेदवारांना उत्तीर्ण व्हावे लागते
  • कौशल्य चाचणी ही की फक्त एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणी मध्ये मिळालेले गुण गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकूण गुणांमध्ये समाविष्ट केले जात नाहीत
  • चाचणीचा कालावधी हा 90 मिनिटांचा असतो आणि लेखी चाचणी ही मराठी भाषेमध्ये घेतली जाते
  • या चाचणीमध्ये सर्व प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे असतात
  • ही परीक्षा एकूण 100 गुणांची लेखी परीक्षा असते

या चाचणीमध्ये खालील विषयांचा समावेश असतो :

  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण
  • मोटार वाहन चालवणे किंवा वाहतुकीबद्दल चे नियम

सशस्त्र पोलीस शिपाई :

  • चाचणी पूर्ण झाल्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाते
  • शारीरिक चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना लिखित चाचणीसाठी पात्र ठरवले जाते
  • उमेदवारांना लेखी परीक्षा अंतर्गत किमान 40 टक्के गुण मिळवणे बंधनकारक असते
  • लेखी परीक्षेमध्ये 40% किंवा त्यापेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजले जातात
  • लेखी चाचणीसाठी कालावधी हा एकूण 90 मिनिटांचा असतो आणि लेखी चाचणी मराठी भाषेमध्ये घेतली जाते
  • ही परीक्षा एकूण 100 गुणांची लेखी परीक्षा असते

या परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असतो :

  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण

भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • अनुसूचित जात प्रमाणपत्र एसी जमातीसाठी
  • इतर मागासवर्गीय प्रमाणपत्र ओबीसी साठी अनुसूचित जमाती
  • प्रमाणपत्र एसटी जमातीसाठी
  • अधिवास प्रमाणपत्र
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • ओळख पुरावा
  • ना हरकत प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो

फ्रीलान्सिंग म्हणजे काय ? 

FAQ :

पोलीस भरतीसाठी पात्रता काय आहे ?

कोणत्याही संस्थेतून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण

पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी किती मार्काची असते ?

50 गुण

Leave a Comment