LG कंपनीकडून पदवीधर विद्यार्थ्यांना 1 लाख रुपये स्कॉलरशिप , लगेचच करा अर्ज : Life’s Good Scholarship Program 2024

Life’s Good Scholarship Program 2024 पदवी आणि पदवीधर विद्यार्थ्यांना एकूण एक लाख रुपयांची स्कॉलरशिप देण्यात येणार आहे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामधील प्रसिद्ध कंपनी एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मार्फत गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एक जबरदस्त स्कॉलरशिप देण्यात येणार आहे या लाईफ गुड स्कॉलरशिप प्रोग्राम 2024 साठी नक्की काय पात्रता लागणार आहे कोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात कोणते लाभ मिळणार आहेत आणि कागदपत्र कोणती लागणार आहेत याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या लेखांमध्ये पाहणार आहोत तुम्ही सुद्धा पदवी किंवा पदवी तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असेल आणि ही स्कॉलरशिप तुम्हाला मिळवावे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख संपूर्ण वाचा.

Life's Good Scholarship Program 2024
Life’s Good Scholarship Program 2024

Life’s Good Scholarship Program 2024 लाईफ स्कॉलरशिप प्रोग्राम २०२४ स्कॉलरशिप इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये जगप्रसिद्ध कंपनी एलजीच्या सीएसआर फंडातून दिली जाणार आहे पदवी आणि पदवीधर अभ्यासक्रम शिकत असलेले विद्यार्थी जे गुणवंत आहेत परंतु ज्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे आणि त्यांना आपल्या शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये आर्थिक मदत आणि आधार मिळावा यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकत असलेले विद्यार्थी या स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकतात आणि त्यांना एका वर्षासाठी ही स्कॉलरशिप मिळू शकते या शिष्यवृत्तीसाठी काही ठराविक महाविद्यालयांची यादी सुद्धा दिलेली आहे या महाविद्यालयामध्ये शिकत असलेले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात.

सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏

गुणवत्ता पूर्ण शिक्षण शाश्वत विकास आणि लैंगिक समानता ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एलजी कंपनीतर्फे ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे या स्कॉलरशिप अंतर्गत पात्र महिला विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य सुद्धा दिले जाणार आहे जेणेकरून महिला सक्षम करण्याचे उद्दिष्ट गाठता येईल.

महत्वाची माहिती :

स्कॉलरशिप चे नावLife’s Good Scholarship Program 2024
पात्रता पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी
लाभ 01 लाख रुपये
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन

Life’s Good Scholarship Program 2024 या स्कॉलरशिप साठी पात्रता काय आहे ?

  • स्कॉलरशिप चा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा यादीमध्ये दिलेल्या मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम शिक्षण घेत असलेला असणे आवश्यक आहे.
  • जर विद्यार्थी प्रथम वर्षामध्ये शिकत असेल तर त्याने इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये कमीत कमी 60 टक्के इतकी गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थी जर द्वितीय तृतीय किंवा चौथ्या वर्षाला शिकत असेल तर त्याने मागील परीक्षेमध्ये कमीत कमी 60% किती गुण मिळवणे आवश्यक आहे
  • एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कर्मचारी यांचे पाल्य या शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत
  • त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त नसावे

या स्कॉलरशिप अंतर्गत मिळणारे लाभ :

या स्कॉलरशिप अंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी एक लाख रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या स्कॉलरशिप मधून नेणारे पैसे विद्यार्थी हे त्यांचा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी वापरू शकतात यामध्ये परीक्षा पेपरची ट्युशन पेपर हे पुस्तके स्टेशनरी प्रवास खर्च इंटरनेट प्लॅन, लॅपटॉप किंवा टॅबलेट ची खरेदी यासारखा खर्च भागवू शकतात.

आवश्यक कागदपत्रे :

  • पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता बारावीचे मार्कशीट
  • दुसरा तिसऱ्या आणि चौथ्या वर्षांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मागील वर्षाचे मार्कशीट
  • पत्त्याचा पुरावा
  • प्रवेश पुरावा
  • महाविद्यालयाकडून मिळालेल्या बोनाफाईड सर्टिफिकेट
  • लाभार्थ्याचे बँक पासबुक
  • फोटो

पुढीलपैकी कोणताही एक कौटुंबिक उत्पन्न पुरावा :

  • इन्कम टॅक्स रिटर्न स्टेटमेंट
  • पगार दाखला
  • फॉर्म 16
  • बी पी एल/रेशन कार्ड
  • तहसीलदार यांच्याकडून मिळालेला उत्पन्न दाखला
  • ग्रामपंचायत कार्यालयाकडून मिळालेल्या दाखला

अर्ज कसा करावा ?

  • अर्ज करण्यासाठी https://www.buddy4study.com/page/life-s-good-scholarship-program?utm_source=featuredBlocks या लिंक वरती क्लिक करा
  • अपलाय या बटणावर क्लिक करा
  • तुम्ही जर या वेबसाईटवर नोंदणी केली नसेल तर सर्वप्रथम आपल्या मोबाईल नंबर किंवा ईमेलचा वापर करून नोंदणी करा
  • तुमच्या अकाउंट मध्ये लॉगिन करा
  • तुम्ही लाईफ गुड स्कॉलरशिप प्रोग्राम 2024 हा फॉर्म ओपन होईल
  • त्यानंतर स्टार्ट अप्लिकेशन वर क्लिक करून फॉर्म भरायला सुरुवात करा
  • आवश्यक असलेली सर्व माहिती भरा
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • अटी आणि शर्ती मान्य करा आणि आपला अर्ज पुन्हा नीट पाहून घ्या
  • सर्व माहिती अचूक आणि बरोबर असल्याची खात्री केल्या नंतर सबमिट पर्याय वरती क्लिक करा
  • अशाप्रकारे तुमचा फॉर्म यशस्वीपणे भरला जाईल. Life’s Good Scholarship Program 2024

निवड प्रक्रिया :

  • कर्जदार आणि वैयक्तिक तपशील शैक्षणिक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे प्रदान करून ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक कामगिरी आणि कौटुंबिक उत्पन्न यांचा समावेश असलेल्या पात्रता निकषांच्या आधारे त्यांच्या पात्रतेची मूल्यांकन केले जाणार आहे
  • मेरीट यादी प्रमाणे उमेदवार पुढील शिष्यवृत्तीसाठी त्यांच्या योग्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी टेलिफोनिक मुलाखत घेतली जाईल
  • त्यांच्या पात्रतेची पडताळणी करण्यासाठी कागदपत्रांच्या पडताळणीसह निवड झाल्यानंतर ऑन बोर्डिंग प्रक्रिया जातात
  • शेवटी निवडलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याला पाठिंबा देण्यासाठी निधी वितरित केला जातो

Life’s Good Scholarship Program 2024 आपल्याला लाईफ गुड स्कॉलरशिप प्रोग्राम 2014 स्कॉलरशिप मिळाली की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला या खात्यामध्ये लॉगिन करून नेहमीचे करत राहावे लागणार आहे कारण ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही महिन्यांचा वेळ लागतो अर्ज केलेल्या अनेक विद्यार्थ्यांपैकी काहींची स्कॉलरशिप साठी निवड होत असते. तुम्ही जर सर्व पात्रता पूर्ण करत असाल तर तुम्हालाही शिष्यवृत्ती नक्कीच मिळेल.

कोणत्या महाविद्यालयातील विद्यार्थी अर्ज करू शकतात ?

  • जयपुर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जयपुर
  • सेंट्रल यूनिवर्सिटी ऑफ कर्नाटक
  • राधा गोविंद युनिव्हर्सिटी रामगड
  • नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी पुणे
  • अभिनव एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स पुणे
  • कुमार गुरु कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
  • स्वामी विवेकानंद युनिव्हर्सिटी कोलकत्ता
  • विद्यादीप सुरत कॉलेज
  • विष्णू कॉलेज मौलाना आजाद विद्यापीठ हैदराबाद
  • सिद्धांत कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज पुणे
  • भगवान महावीर युनिव्हर्सिटी सुरत
  • मानव रचना युनिव्हर्सिटी फरीदाबाद
  • रामगड इंजीनियरिंग कॉलेज रामगड

10 वी नंतर काय करावे ?

FAQ :

स्कॉलरशिप मिळवण्यासाठी पात्रता काय आहे ?

स्कॉलरशिप साठी विद्यार्थी हा यादीमध्ये दिलेल्या मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम शिक्षण घेत असलेला असणे आवश्यक आहे.

स्कॉलरशिप मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणते आहे ?

स्कॉलरशिप मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रे वरती सांगितल्याप्रमाणे आहेत यासाठी आपला लेख पूर्ण वाचा.

Leave a Comment