Medical Courses After 12th Without NEET 12 वी नंतर जर तुम्हाला मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर करण्याची इच्छा असेल तर नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट परीक्षा द्यावे लागते हे आपल्याला माहीत आहे मात्र नीट परीक्षा इतकी सोपी सुद्धा नाही की कोणीही विद्यार्थी सहजपणे पास होऊन जाईल. नीत परीक्षेमध्ये पुरुषांना अभावी बरेच विद्यार्थ्यांना मेडिकल किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करण्याचे स्वप्न सोडून द्यावे लागते परंतु तुम्हाला माहीत आहे की नीट परीक्षा न देता सुद्धा आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये करियर बनवू शकतो मेडिकल क्षेत्रामध्ये असे खूपसे कोर्सेस आहेत ज्यासाठी आपण नीट परीक्षा न देता सुद्धा प्रवेश घेऊ शकतो. आपण मेडिकल क्षेत्रांमधील करिअरचे स्वप्न पूर्ण करू शकतो.
राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा ही मेडिकल क्षेत्रांमधील शिक्षणाचे प्रवेशासाठी घेतली जाणारी देशांमधील सर्वात मोठी परीक्षा आहे दरवर्षी सुमारे 15 लाख विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, यासारख्या वैद्यकीय कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी नीट परीक्षा द्यावी लागते परंतु खूपच कमी विद्यार्थ्यांना ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करता येते परंतु उर्वरित विद्यार्थ्यांनी निराश होण्याची गरज नाही. असे अनेक कोर्सेस आहेत ज्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी नीट परीक्षेची आवश्यकता नाही आज आम्ही तुम्हाला अशा फोर्सेस ची माहिती देणार आहोत जे करून तुम्ही नीट परीक्षा न देता आरोग्य क्षेत्रामध्ये उत्तम करिअर घडवू शकता, चला तर मग पाहूयात.
सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏
Medical Courses After 12th Without NEET बॅचलर इन फार्मसी :
Medical Courses After 12th Without NEET बॅचलर इन फार्मसी किंवा बी फार्म हा कोर्स 12 वी सायन्स नंतर करता येतो या अभ्यासक्रमामध्ये औषधांचा अभ्यास संशोधक तयार करणे दसऱ्याच्या औषधांवर संशोधन इत्यादी शिकवले जाते तर तुम्हाला फार्मासिस्ट व्हायचं असेल तर बॅचलर इन फार्मसी हा कोर्स करावा लागतो भारतामध्ये 12 वी नंतर या कोर्सला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत आहे.
या कोर्सच्या प्रवेशासाठी विविध संस्था आणि विद्यापीठे आपली स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतात आणि या प्रवेश परीक्षेमध्ये गुणांच्या आधारे प्रवेश केला जातो त्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे नीट परीक्षा घेतली जाते त्या एन टी ए द्वारे सुद्धा फार्मसी अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रवेश परीक्षा घेतली जाते.
फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध फॉर्म कंपन्या सौंदर्यप्रसाधने उत्पादन करणाऱ्या कंपन्या, हर्बल उद्योग यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहेत. तसेच संशोधन क्षेत्रामध्ये सुद्धा करिअर करण्याच्या संधी आहेत. तसेच विविध सरकारी विभागांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळवता येते. Medical Courses After 12th Without NEET
बीएससी नर्सिंग :
आरोग्य क्षेत्रामध्ये डॉक्टर हा जसा महत्त्वाचा घटक आहे तसेच नर्स म्हणजे परिचारिका हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. रुग्णांची काळजी घेणे त्यांना औषध देणे इंजेक्शन देणे अशा प्रकारची सर्व कामे या कोर्समध्ये शिकवली जातात रुग्ण सेवेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बीएससी नर्सिंग हा चार वर्षांचा पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अनेक सरकारी तसेच खाजगी रुग्णालय, शासकीय संस्था, नर्सिंग कॉलेज, विविध स्वयंसेवी संस्था यामधील नोकरीच्या खूप संधी आहेत तसेच हा कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारांना पगार सुद्धा चांगला मिळतो.
बी टेक इन बायोमेडिकल :
बी टेक इन बायोमेडिकल इंजिनिअरिंग हा सुद्धा 12 वी सायन्स नंतर चार वर्षांचा कोर्स आहे या कोर्सची फी 50,000 ते 2 लाख पर्यंत असू शकते. सरकारी विद्यालयामध्ये खाजगी विद्यालयाच्या मानाने कमी फी आकारली जाते.
हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना बायोमेडिकल इंजिनियर, प्रोजेक्ट मॅनेजर, मायक्रो बायोलॉजिस्ट, बायो केमिस्ट, बायोमेडिकल मॅनेजर ,रिसर्च ॲनालिस्ट, बायोमेडिकल टेक्निशियन इत्यादी पदांवर नोकरी करण्याची संधी मिळते.
बीएससी न्यूट्रिशन :
हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून यामध्ये पोषण आणि आहार विज्ञानाविषयी संपूर्ण ज्ञान दिले जाते पी एस सी न्यूट्रिशन हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विविध बहुराष्ट्रीय कंपन्या आरोग्य केंद्रीय दवाखाने यामध्ये नोकरीच्या संधी आहे.
आताच्या आधुनिक काळामध्ये आरोग्यविषयक होणाऱ्या जागृतीमुळे पोषण आणि आहार याबाबतीत लोक जागरूक झाले आहेत वाढणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांमुळे आहार तज्ञ यांचा सल्ला घेण्यासाठी लोक प्राधान्य देत आहेत त्यामुळे निश्चितच पोषण आणि आहार शास्त्रात बीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात प्रचंड मागणी राहणार आहे. Medical Courses After 12th Without NEET
बीए मानसशास्त्र :
बदलत्या ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे मानसिक आरोग्य अस्थिर राखणे हे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. मानसिक आरोग्य अस्थिर ठेवणे हे खूप कठीण काम होऊन बसले आहे. तसेच प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या तरी मानसिक समस्यांना सध्याच्या काळात तोंड द्यावे लागत आहे. अशा वेळी मनसोपचार तज्ञांचा सल्ला आणि उपचार घेणे क्रमप्राप्त ठरते. शेवटी त्यांचे मन सुदृढ असेल त्यांचे शरीर सुद्धा निरोगी बनते.
12 वी नंतर बीए मानसशास्त्र हा तीन वर्षांचा कोर्स करून तुम्ही या क्षेत्रांमधील करिअरची सुरुवात करू शकता. यासाठी 12 वी सायन्स मधून उत्तीर्ण असणे आवश्यक नाही आर्ट किंवा कॉमर्स मधून 12 वी केली असेल तर या कोर्समध्ये प्रवेश घेता येतो.
बीएससी फिजिओथेरपी :
Medical Courses After 12th Without NEET 12 वी सायन्स नंतर बीएससी फिजिओथेरपी हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून NEET न देता आरोग्य क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी हा कोर्स उत्तम पर्याय आहे. या कोर्सनंतर विद्यार्थी फिजिओथेरपिस्ट, संशोधक, संशोधन सहाय्यक, थेरपी मॅनेजर, किंवा या क्षेत्रामध्ये व्याख्याता म्हणून काम करू शकतात.
काही महत्त्वाचे पर्याय :
वरील कोर्स व्यतिरिक्त अजून खूप सारे कोर्स आहेत जे आपण NEET न देता सुद्धा करू शकतो आणि वैद्यकीय क्षेत्रामधील करिअरची सुरुवात करू शकतो. Medical Courses After 12th Without NEET
- बीएससी बायो टेक्नॉलॉजी
- बीएससी एग्रीकल्चर सायन्स
- बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी
- बीएससी बायो टेक्नॉलॉजी
- फॉरेन सिक्स सायन्स
- बीएससी क्लिनिकल रिसर्च
- बीएससी क्लीनिकल सायकॉलॉजी
- बीएससी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी
FAQ :
कोणते कोर्स करण्यासाठी NEET परीक्षा द्यावी लागते ?
एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस
बॅचलर इन फार्मसी अंतर्गत कोणत्या नोकरीची संधी आहे ?
फॉर्म कंपन्या सौंदर्यप्रसाधने उत्पादन करणाऱ्या कंपन्या, हर्बल उद्योग