कॉलेज विद्यार्थ्यांना मिळणार या टॉप 5 शिष्यवृत्ती , पहा काय आहे पात्रता : Top 5 Scholarship 2024

Top 5 Scholarship 2024 12 वी नंतर उच्च शिक्षण घेणे आता सोपे राहिले नाही महागडे शिक्षण हे आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या मार्गामध्ये अडथळा ठरतो अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी शासनाकडून अनेक शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात ज्याच्या मदतीने गुणवंत आणि आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थी आपले उच्चशिक्षण सुरू ठेवू शकतात विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी खूप मदत करतात अशा टॉप पाच शिष्यवृत्ती बद्दल माहिती जाणून घेऊया.

Top 5 Scholarship 2024
Top 5 Scholarship 2024

महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची कमतरता भासू नये यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या शिष्यवृत्ती योजना नेहमी अमलात आणल्या जातात.

सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏

Top 5 Scholarship 2024 कॉलेज आणि यूनिवर्सिटी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची केंद्रीय क्षेत्र योजना :

ही एक अतिशय व्यापक शिष्यवृत्ती आहे ही सीएसएसएस शिष्यवृत्ती दरवर्षी 82 हजार विद्यार्थ्यांना दिले जाते यामध्ये 50-50 टक्के मुले आणि मुली आहेत महाविद्यालय आणि विद्यापीठामधील विद्यार्थ्यांसाठी आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पदवी च्या काळामध्ये दरवर्षी 10 ₹1000 पदव्युत्तर शिक्षणासाठी दरवर्षी 20,000 रुपये दिले जातात अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजा भागवणे यामागचा उद्देश आहे.

शिष्यवृत्ती साठी पात्रता :

शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी उमेदवारांना 80 टक्के पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा जास्त नसावे.

किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना :

Top 5 Scholarship 2024 विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये प्रगती करणे हा या शिष्यवृत्तीचा उद्देश आहे. ही शिष्यवृत्ती विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग अंतर्गत दिले जाते या शिष्यवृत्तीसाठी परीक्षा द्यावी लागते ही परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स द्वारे घेतले जाते किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पीएचडी पूर्ण होईपर्यंत दर महिन्याला 5000 ते 7000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप दिली जाते.

शिष्यवृत्तीसाठी पात्रता :

या परीक्षेमध्ये प्रवेश घेण्यासाठी 12 वी मध्ये 75 टक्के गुण असणे आवश्यक आहे. या परीक्षांमध्ये अभियोग्यता चाचणी घेतली जाते ज्याद्वारे निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शिष्यवृत्ती दिली जाते.

पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना :

दहशतवादी आणि नक्षलवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले माजी सैनिक, इतर केंद्रीय दल, पोलीस कर्मचारी आणि रेल्वे कर्मचारी यांची मुले आणि विधवांना पंतप्रधान शिष्यवृत्ती दिली जाते. उच्च तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणामध्ये त्यांना प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शिष्यवृत्ती अंतर्गत दर महिन्याला 2000 ते 3000 रुपये दिले जातात. Top 5 Scholarship 2024

उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नसलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी पीएम शिष्यवृत्तीची रचना करण्यात आली आहे. केंद्रीय सैनिक बोर्ड द्वारे पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना किंवा पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकाराचे हे काही यांनी केंद्रीय नियामक मान्यता दिली आहे.

शिष्यवृत्ती साठी पात्रता :

शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी तुम्हाला 12 वी डिप्लोमा किंवा पदवी मध्ये किमान 60 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचे वय 18 ते 25 वर्षाच्या दरम्यान असावे.

प्रगती शिष्यवृत्ती योजना :

ही शिष्यवृत्ती मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाकडून दिली जाते. 12 वी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 5000 मुलींना शिष्यवृत्ती दिली जाते त्यापैकी 2000 पदवी धारकांना आणि 2000 डिप्लोमा धारकांना शिष्यवृत्ती देण्यात येते तर अपंग मुलींसाठी 1000 दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती राखीव असते. शिक्षणाच्या माध्यमातून मुलींना सक्षम करणे हा या शिष्यवृत्ती मागचा उद्देश आहे निवडलेल्या विद्यार्थिनींना इतर लाभांश वार्षिक 50,000 रुपये शिष्यवृत्ती मिळते.

शिष्यवृत्ती साठी पात्रता :

ही शिष्यवृत्ती गुणवत्तेच्या आधारे दिली जाते यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त संस्था प्रवेश घ्यावा लागतो. यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा जास्त नसावे.

महात्मा गांधी राष्ट्रीय फेलोशिप :

महात्मा गांधी राष्ट्रीय फेलोशिप द्वारे आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक धोरण आणि व्यवस्थापन प्रमाणपत्र कार्यक्रम आहे या दोन वर्षाच्या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत आय एम ला प्रशिक्षण दिले जाते पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांना दर महिन्याला 50 हजार रुपये आणि दुसऱ्या वर्षी दर महिन्याला 60 हजार रुपये दिले जातात.

21 ते 20 गटातील महिला आणि पुरुषांसाठी एक संधी आहे. कौशल्य विकासाच्या सुधारणा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला प्रेरक सहाय्य करण्यासाठी काही प्रमाणात शैक्षणिक किंवा व्यावसायिक कौशल्य प्राप्त केले आहेत. शैक्षणिक भागीदार म्हणून आयआयएम बंगळूर सोबत लॉन्च करण्यात आली आहे सध्या या कार्यक्रमाअंतर्गत 06 राज्यांमधील 69 जिल्ह्यामध्ये 69 फेलो कार्यरत आहेत

फेलोशिप साठी पात्रता :

या फेलोशिपसाठी विद्यार्थी पदवीधर असणे भारताचे नागरिक असणे आणि त्याचे वय किमान 21 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असणे आवश्यक आहे तसेच अर्जदारास 10 वी नंतर ग्रामीण भागामध्ये तीन वर्षे सामाजिक ना नफा क्षेत्रामध्ये काम करण्याचा अनुभव असावा. Top 5 Scholarship 2024

महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची कमतरता भासू नये यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या शिष्यवृत्ती योजना नेहमी अमलात आणल्या जातात. जेणेकरून या योजनेचा लाभ यशस्वी वृत्तीचा लाभ घेऊन घरी कुटुंबामधील आर्थिकदृष्ट्या करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार नाही आणि त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून भरपूर सवलती या महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने दिले आहेत.

तसेच महाराष्ट्र मध्ये 1 केंद्रीय विद्यापीठ , 19 राज्य विद्यापीठ आणि 21 विद्यापीठे आहेत ज्या महाराष्ट्रात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात संधी निर्माण करतात . तसेच महाराष्ट्र शिष्यवृत्ती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसह महाराष्ट्र मधील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार नाही म्हणून , शिक्षणाचा त्रास मुक्त प्रवेश प्रदान करण्यासाठी एक प्रेरक शक्ती म्हणून कार्यकर्ते.

बारावी नंतर काय करावे ?

FAQ :

किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेसाठी पात्रता काय आहे ?

प्रवेश घेण्यासाठी 12 वी मध्ये 75 टक्के गुण असणे आवश्यक ,या परीक्षांमध्ये अभियोग्यता चाचणी घेतली जाते ज्याद्वारे निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शिष्यवृत्ती दिली जाते

पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्रता काय आहे ?

शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी तुम्हाला 12 वी डिप्लोमा किंवा पदवी मध्ये किमान 60 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचे वय 18 ते 25 वर्षाच्या दरम्यान असावे

प्रगती शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत किती शिष्यवृत्ती मिळते ?

वार्षिक 50,000 रुपये

Leave a Comment