या आहेत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या योजना ; वाचा सविस्तर माहिती : Vidyarthi Yojana 2024

Vidyarthi Yojana 2024 समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद मार्फत विद्यार्थी लाभाच्या योजना प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलांसाठी प्रदान केल्या जातात ग्रामीण भागामधील तसेच आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी याचा खूप मोठा उपयोग होणार आहे.

Vidyarthi Yojana 2024
Vidyarthi Yojana 2024

Table of Contents

सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏

Vidyarthi Yojana 2024 माध्यमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती :

  • मान्यताप्राप्त माध्यमिक शाळेमध्ये शिक्षण घेत असलेले अनुसूचित जाती जमाती विमुक्त आणि भटक्या जाती मधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिक प्रोत्साहन मिळवण्यासाठी शिष्यवृत्ती योजना राबवली जात आहे इयत्ता पाचवी ते दहावी मधील एका वर्गामधील दोन विद्यार्थ्यांना 50% पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याची आवश्यकता नसून संबंधित शाळेने मुलांची यादी जात इयत्ता आणि इत्यादी माहितीसह प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.
  • विद्यालयाने संबंधित मुलांची यादी जातीनुसार इयत्ता आणि त्यांची गुणपत्रके यांची झेरॉक्स झोपत जोडणे आवश्यक आहे.
  • विद्यालयाने सदरचा प्रस्ताव समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करणे बंधनकारक आहे.
  • नवीन दरानुसार इयत्ता पाचवी ते सातवी रुपये 50 प्रति महिना 10 महिन्यांसाठी ₹100 आठवी ते दहावी 75 रुपये दर महिना 10 महिन्यांसाठी 750

अस्वच्छ व्यवसायामध्ये कामगार पालकांच्या मुलांना शालांत पूर्व शिष्यवृत्ती योजना :

  • अस्वच्छ व्यवसायामध्ये काम करणाऱ्या कोणत्याही जाती किंवा जमातीच्या मुलांना किंवा मुलींना इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिक्षण घेत असताना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
  • विहित नमुना मधील अर्ज संबंधित शाळेमध्ये मुख्याध्यापक यांच्याकडे सादर करावेत
  • उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला जातीचा दाखला
  • अस्वच्छ व्यवसायामध्ये काम करीत असल्याबाबतचे संबंधित प्राधिकार याचे प्रमाणपत्र
  • उत्पन्न दाखला , ही सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडायचे आहेत
  • हा अर्ज संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडे सादर करावा Vidyarthi Yojana 2024

व्यावसायिक पाठ्यक्रमात संलग्न वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना :

  • वैद्यकीय अभियांत्रिकी तंत्रनिकेतन कृषी आणि पशुवैद्यकीय महाविद्यालय मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही विशेष निर्वाह भत्ता ची योजना सुरू करण्यात आली आहे.
  • विहित नमुन्यातील अर्ज संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याकडे सादर करावा
  • संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे
  • वसतिगृहामध्ये राहत असल्याबाबतचे प्रमाणपत्र
  • पालकांचे वार्षिक उत्पन्न 50 हजार 920 असलेल्या भारत सरकार शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांसाठीही विशेष निर्वाह भत्ता ची रक्कम ₹100 प्रमाणे दर महिन्याला 10 महिन्यांसाठी दिली जाते.
  • संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रकरणांमध्ये त्रुटी नसल्यास अनुदान उपलब्धतेनुसार तीन महिन्याचे आत मंजुरी दिली जाते.
  • संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य अथवा जिल्हा समाज कल्याण अधिकारी

सैनिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता योजना :

  • अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जाती अनुसूचित जमाती विशेष मागास प्रवर्गातील शास्त्रांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 25000 रुपयांपेक्षा कमी आहे अशा क्षेत्रांसाठी ही शिष्यवृत्ती मंजूर केली जाते.
  • विहित नमुन्यातील अर्ज प्राचार्य सैनिक शाळा यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे
  • उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला, तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांनी दिलेला गतवर्षीचा उत्पन्न दाखला, गतवर्षीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रिका इत्यादी कागदपत्रांची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे
  • प्राचार्य संबंधित सैनिक शाळा यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे
  • वसतिगृहामध्ये निवास भोजन कपडे पॉकेट मनी शिक्षण फी, परीक्षा फी इत्यादी वरील संपूर्ण खर्च प्रदान केला जातो
  • सदरची जी पण रक्कम असेल ती प्राचार्य संबंधित सैनिक शाळा यांना सुपूर्त करण्यात येते.
  • प्राचार्य संबंधित सैनिक शाळा केव्हा जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे तक्रार निवारणासाठी अर्ज देणे आवश्यक आहे Vidyarthi Yojana 2024

मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय मुलांसाठी शासकीय वसतिगृह उघडणे व त्याचे परीक्षण :

  • Vidyarthi Yojana 2024 अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, अपंग, अनाथ आणि आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय गटांमधील इयत्ता आठवीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 50 हजार पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना जातीनुसार शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश गुणवत्तेनुसार दिला जातो.
  • अर्जाचे नमुने मोफत स्वरूपामध्ये संबंधित वसतिगृहाचे गृहपाल यांच्याकडून पुरवला जाणार आहे
  • उत्पन्न तहसीलदार यांनी दिलेला दाखला, तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला जातीचा दाखला, मागील वर्षाचे गुणपत्रिका, मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची शिफारस पत्र इत्यादी कागदपत्रे यांची झेरॉक्स अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे
  • संबंधित शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांच्याकडे अर्ज सादर करावा
  • वसतिगृहामध्ये मोफत निवास, भोजन, शालेय स्टेशनरी, पाठ्यपुस्तके रुपये 25 प्रति महिना निर्वाह भत्ता विद्यालयीन विद्यार्थ्यांना गणवेश इत्यादी सुविधा पुरवल्या जातात
  • विद्यालयीन विभागांमधील छात्रा 15 मे पूर्वी आणि महाविद्यालयीन विभागांमधील विद्यार्थ्यांनी 20 जून आधी अगर निकाल लागलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत सादर केलेले अर्ज सत्र सुरू होण्यापूर्वी प्रवेश देतात.

मुलींच्या शिक्षणाची विशेष योजना उपस्थिती भत्ता :

पात्र लाभार्थी –

Vidyarthi Yojana 2024 दुर्बल घटकांमधील मुलींना शाळेमध्ये येण्यास प्रोत्साहन मिळावे आणि त्यांचे शिक्षणामध्ये सातत्य राहावे या हेतूने आदिवासी उपाययोजना क्षेत्रांमधील इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी मधील दारिद्र्य रेषेखालील सर्व विद्यार्थिनींना आणि या क्षेत्रात बाहेरील सर्व मागासवर्गीय विद्यार्थिनींना या भरतीचा सर्वप्रथम त्यांची महिन्यांमध्ये किमान 75 टक्के उपस्थिती असल्यास प्रत्येक दिवसासाठी रुपये एक याप्रमाणे उपस्थिती भत्ता देण्यात येतो या योजनेचा लाभ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शाळे मधील विद्यार्थिनींना दिला जातो.

लाभ मिळण्याची पद्धत –

  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वेगवेगळे अर्ज करण्याची गरज नसते
  • संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची संपर्क साधावा
  • भत्त्याचे वाटप दोन महिन्यांपासून एकदा केले जाते
  • या योजनेची अधिक माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी किंवा विस्तार अधिकारी किंवा केंद्रप्रमुख प्रमुख मुख्याध्यापक यांच्याकडे मिळू शकते.

सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना :

लाभार्थी –

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांमधील मुली आर्थिक परिस्थितीमुळे शाळा सोडून जाऊ नयेत म्हणून त्यांच्या सहाय्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेसाठी अनुसरून जिल्हा स्तरांवर ते विश्वस्त संस्था स्थापन करण्यात आले आहेत समाजामधील शिक्षण प्रेमी, दानशूर व्यक्तींकडून स्वयंस्फूर्त मिळणारा निधी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ठेव म्हणून ठेवला जातो या मुदत ठेवी मधून आलेल्या अभ्यासातून इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थिनीस शिक्षणासाठी दर महिन्याला 30 रुपयांची मदत दिली जाते

मुलींची निवड –

Vidyarthi Yojana 2024 आशा गरजू मुलींची निवड गट शिक्षणाधिकाऱ्यांचे प्राप्त झालेल्या यांमधून जिल्हा विश्वस्त संस्था मार्फत केली जाते सदर निवड केलेल्या विद्यार्थ्यांनी दर महिन्याला 30 हजार रुपये याप्रमाणे दहा महिन्याचे शैक्षणिक वर्षासाठी 300 विद्यार्थिनींच्या पालकांना ही मदत शाळा व्यवस्थापन समितीच्या सभांमध्ये दिले जाते यासंबंधी अधिक माहिती जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी/ गटशिक्षणाधिकारी/ केंद्रप्रमुख/ शाळा मुख्याध्यापक यांच्याकडे मिळू शकते.

अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत बस प्रवास योजना :

उद्देश –

ग्रामीण भागामध्ये मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी एसटीने मोफत प्रवासाची योजना शासनाने 1996 ते 97 पासून सुरू केली आहे या योजनेचा लाभ ज्या गावांमध्ये माध्यमिक शाळेची सोय नाही आणि ज्या विद्यार्थ्यांची माध्यमिक शाळेमध्ये 75% उपस्थिती असल्याचे निदर्शनास आहे मुलींना माध्यमिक शाळेमध्ये प्रवेश घेतल्याचा मुख्याध्यापकांच्या सहीचा दाखला शाळेमार्फत राज्य परिवहन मंडळाच्या विभागीय कार्यालयाकडे सादर केल्यानंतर राज्य परिवहन मंडळाकडून मुलींना मोफत प्रवास पास उपलब्ध करून दिला जातो.

स्थलांतरित कामगारांच्या मुलांचे शिक्षण :

राज्यांमधील शेतमजूर सहा ते सात महिन्यांच्या कालावधीसाठी साखर कारखान्यांमधून काम करण्यासाठी स्थलांतर करतात स्थलांतरित ठिकाणी त्यांच्या मुलांना शिक्षण चालू ठेवता यावे या दृष्टीने साखर कारखान्याच्या परिसरामध्ये तात्पुरत्या शाळा उघडण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

या शाळांसाठी वेतन आणि खर्चासाठी अनुदान देण्याची तरतूद शासन करणार आहे परंतु साखर कारखान्यांच्या परिसरामध्ये या मुलांसाठी जेवण्याचे आणि वसतिगृहाची सोय साखर कारखान्याचे निधीमधून करावी लागेल.

शाळेची कार्यपद्धती –

Vidyarthi Yojana 2024 विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या मूळ गावांमधून स्थलांतर करत असताना मुलांना शाळा सोडल्याचा दाखला दिला जाईल यानुसार प्रगती प्रमाणपत्र दाखल्याच्या आधारे कारखान्याच्या साईट वरील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो हंगामाच्या शेवटी शिक्षक एक तपशीलावर ती अहवाल देईल विद्यार्थी आपल्या गावी परत जाताना पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमाचा दाखला त्याच्या मूळ शाळेला दिला जाईल या आधारे आपले शिक्षण अखंडपणे पूर्ण करेल अशा प्रकारची शाळा सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होईल आणि मी अखेर पर्यंत सुरू राहील.

आयटीआय म्हणजे काय ?

FAQ :

या योजनांचे फायदे काय आहेत ?

या योजनेअंतर्गत मुलींना मोफत शिक्षण मिळते

या योजनांचा लाभ कोणाला मिळतो ?

आर्थिक दुर्बल कुटुंबांमधील विद्यार्थ्यांना

Leave a Comment